मुंबईतून हातगाड्या लवकरच हद्दपार होण्याची शक्यता !
मुंबई – मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, झव्हेरी बाजार येथील रस्त्यांवर दिसणार्या हातगाड्या येत्या काळात हद्दपार होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्या हातगाड्यांऐवजी चालकांना बॅटरीवर चालणार्या ढकलगाड्या देण्याविषयी चाचपणी चालू असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यासाठी ‘आयआयटी’सारख्या संस्थेचेही साहाय्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.