रुग्णालयाची दुरवस्था पाहून विधानसभा अध्यक्षांनी अधिकार्यांना खडसावले !
विधानसभा अध्यक्षांची सेंट जॉर्जेस रुग्णालयाला अचानक भेट
रुग्णालयात कुत्रे झोपलेले, तर वैद्यकीय कचरा उघड्यावर !
मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी रुग्णालयात काही ठिकाणी कुत्रे झोपलेले होते, तर कुठे वैद्यकीय कचरा तसाच उघड्यावर ठेवण्यात आलेला होता. रुग्णालयाची दुरवस्था पाहून संतप्त झालेल्या नार्वेकर यांनी अधिकार्यांना खडसावले, ‘‘हे रुग्णालय आहे कि मस्करी ? हे माणसांचे रुग्णालय आहे कि प्राण्यांचे रुग्णालय ?’’ नार्वेकर यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे अधिकारी आणि आधुनिक वैद्य यांची तारांबळ उडाली. नार्वेकर यांच्या प्रश्नांवर अधिकार्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिका
रुग्णांच्या आरोग्याप्रती असंवेदनशील असणार्या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांवर कठोर कारवाईच करायला हवी !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! : www.hindujagruti.org