मराठा आरक्षणासाठी मुंबईतील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या !
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आलेल्या जालना येथील सुनील कावळे या व्यक्तीने वांद्रे (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या केली. सुनील कावळे यांच्या बॅगेत आत्महत्या करत असल्याची चिठी सापडली आहे. १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कावळे यांनी आत्महत्या केली असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.