रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री राजमातंगी यागा’च्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री राजमातंगी याग’ झाला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘श्री राजमातंगी यागा’च्या वेळी देवीकडून पुष्कळ वात्सल्यभाव प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
२. ‘मागील ५ वर्षांपासून मला होणार्या त्रासाचे निवारण करण्यासाठी देवी सूक्ष्मातून साहाय्य करण्यासाठी आली आहे’, असे मला जाणवले.
३. श्री राजमातंगी यागाच्या पाचव्या दिवशी प्राणशक्ती अल्प असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्णाहुतीच्या वेळी यागाच्या ठिकाणी आले होते. ते अधूनमधून नमस्कार करत होते. तेव्हा ‘त्यांना तेथे उपस्थित असणार्या देवतांचे सूक्ष्मातून दर्शन होत आहे आणि ते देवतांना नमस्कार करत आहेत’, असे मला जाणवले.
४. यागाच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या देवी आहेत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका अन् सद्गुरु नीलेश सिंगबाळ हे ऋषिमुनी आहेत’, असे मला वाटत होते.
५. याग चालू झाल्यावर मध्येच अग्नी प्रज्वलित झालेला दिसायचा, तर काही क्षणांतच पुष्कळ धूर होत होता. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मोठ्या वाईट शक्ती यागात पुष्कळ अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.’
६. मी माझ्या हातांनी स्वतःभोवतालचे त्रासदायक शक्तीचे आवरण काढत होते. तेव्हा मला पुष्कळ जांभया आणि ढेकरा येत होत्या, तसेच पंखा चालू असूनही मला पुष्कळ घाम येत होता. जणूकाही ‘मला त्रास देणार्या वाईट शक्तीचे यज्ञातील चैतन्याशी सूक्ष्म युद्ध चालू आहे’, असे मला वाटले. त्यानंतर मला हलके वाटून आनंद जाणवला.’
– सौ. विद्या दिलीप नलावडे, फोंडा, गोवा. (७.१.२०२१)
|