श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी पाठवलेल्या विभूतीचा दैवी सुगंध एक वर्ष टिकून रहाणे
‘सप्टेंबर २०२२ मध्ये माझे एक शस्त्रकर्म झाले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी विभूती पाठवली होती.
एक वर्ष झाले, तरी त्या विभूतीचा दैवी सुगंध तसाच आहे. त्यामध्ये ‘पुष्कळ चैतन्य आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘देवीने दिलेल्या प्रसादाचे महत्त्व किती अमूल्य आहे !’, याची मला सतत जाणीव होते. देवाने ही जाणीव करून दिल्याबद्दल त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |