पाकच्या ‘अबाबील’ परमाणू क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी !

भारताच्या ‘एस् ४००’ क्षेपणास्त्राशी स्पर्धा करण्यासाठी बनवले आहे हे क्षेपणास्त्र !

क्वेटा (बलुचिस्तान) – पाकिस्तानच्या अबाबील परमाणू क्षेपणास्त्राचे परीक्षण अयशस्वी झाले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र बलुचिस्तानच्या डेरा बुग्ती जिल्ह्यातील फेलावाघ भागात रहिवासी क्षेत्रापासून केवळ ५०० फूट अंतरावर पडले. पाक हे क्षेपणास्त्र भारताच्या ‘एस् ४००’ या क्षेपणास्त्राशी स्पर्धा करण्यासाठी बनवत आहे. पाकिस्तानी सैन्याचे मात्र ‘ही चाचणी यशस्वी झाली’, असा दावा केला आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार ‘अबाबील’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता अधिकाधिक २ सहस्र २०० किमी आहे. या क्षेपणास्त्राची प्रथम चाचणी वर्ष २०१७ मध्ये करण्यात आली होती; परंतु अजूनही त्याला पाकिस्तानने तैनात केलेले नाही. पाकने दावा केला आहे की, हे क्षेपणास्त्र परमाणू बाँबही वाहून नेऊ शकते.

संपादकीय भूमिका 

भुकेकंगाल झालेल्या आणि आर्थिक डबघाईला लागलेल्या पाकिस्तानचा हिंदुद्वेष काही करता शमत नाही, हेच अशा परीक्षणांतून दिसून येते. ‘अस्तित्वाचा प्रश्‍न आला, तरी अहंकार अन् द्वेष मनुष्याला घेऊन बुडतो’, हे जे सांगितले आहे, याचे पाकिस्तान आजचे मोठे उदाहरण होय !

खरेतर पाकिस्तानचे एखादे परीक्षण ‘यशस्वी’ झाले, तर ती बातमी बनेल ?