कोलकाता येथे श्री दुर्गापूजेत ‘कुमारिका’ म्हणून मुसलमान मुलीची निवड !
कोलकाता – शहरातील नवीन नगरीत श्री दुर्गापूजेचे आयोजन करणार्यांनी पूजेची परंपरा खंडित करत महाष्टमीला ‘कुमारिका पूजना’साठी श्री दुर्गादेवी म्हणून नफिसा नावाच्या ८ वर्षीय मुसलमान मुलीची निवड केली आहे. धार्मिक सलोख्याचा संदेश देण्याच्या दृष्टीने ही निवड केल्याचे आयोजकांनी सांगितले. (मुसलमान किंवा ख्रिस्ती यांनी त्यांच्या धार्मिक कृत्यांमध्ये हिंदूंना कधी सामावून घेतल्याचे ऐकिवात आहे का ? – संपादक)
१. महाष्टमीला दुर्गादेवी म्हणून ब्राह्मण कुमारिकेची निवड करण्याची पद्धत प्रचलित आहे. धार्मिक सलोखा आणि सर्वसमावेशकता यांना चालना देण्याच्या उद्देशाने मुसलमान कुमारिकेची निवड करण्यात आल्याचे ‘मृट्टिका क्लब’च्या महिला समितीने म्हटले आहे.
२. एका शतकापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कृतीतून प्रेरणा घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. वर्ष १८९८ मध्ये प्रवासात असतांना स्वामी विवेकानंद यांनी मुसलमान नाविकाच्या ४ वर्षीय मुलीचे ‘कुमारिका पूजन’ केले होते आणि या विधीचा एक भाग म्हणून तिच्या पाया पडून श्री दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळवला होता, या घटनेचा आयोजकांनी या वेळी उल्लेख केला. (गर्व से कहो हम हिन्दू है’, ही घोषणाही स्वामी विवेकानंद यांनी दिली होती. त्याविषयी आयोजकांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|