अमेरिकेतील पॅलेस्टाईन वंशाच्या खासदार राशिदा तलैब यांची इस्रायलच्या समर्थनावरून बायडेन यांच्यावर टीका
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या पॅलेस्टाईन वंशाच्या खासदार राशिदा तलैब यांनी अमेरिकेकडून इस्रायलला युद्धात करण्यात येणार्या साहाय्यावरून टीका केली आहे. येथील कॅपिटल हिल भागात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी त्यांनी ही टीका केली. या फेरीमध्ये युद्धविराम करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गाझामध्ये रुग्णालयावर झालेल्या आक्रमणासाठी इस्रायलला उत्तरदायी ठरवण्यात आले.
राशिदा म्हणाल्या की, मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सांगू इच्छिते की, इस्रायलच्या सूत्रावर संपूर्ण अमेरिका तुमच्या समवेत नाही, हे तुमच्या लक्षात यायला हवे. आम्ही नरसंहार होतांना पहात आहोत; मात्र आम्ही काही करू शकत नाही.
संपादकीय भूमिकाभारत किंवा जगात असे किती हिंदु लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या धर्मबांधवांसाठी व्यवस्थेशी दोन हात करतात ? |