कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची चतुर्थीला कुष्मांडा रूपातील पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीची कुष्मांडा रूपात बांधण्यात आलेली पूजा

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची चतुर्थीला कुष्मांडा रूपातील पूजा बांधण्यात आली होती. श्री दुर्गासप्तशती अंतर्गत श्री ब्रह्मदेव आणि श्री मार्कंडेय ऋषि यांच्यातील संवादाप्रमाणे सर्वांचे रक्षण करण्यासाठी समर्थ असे देवीकवच आहे. त्यानुसार देवी ९ नावांनी प्रसिद्ध आहे. ही ९ नावे म्हणजेच नवदुर्गा होय. श्री दुर्गामातेच्या चौथ्या रूपाचे नाव कुष्मांडा आहे. तिने तिच्या मंद आणि प्रसन्न हास्यातून ब्रह्मांड उत्पन्न केले.