कोकिळेने जाणलेले श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील देवत्व आणि त्यांच्या दर्शनाने कोकिळेने व्यक्त केलेला आनंद !

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उद्यानात चालत असतांना कोकिळा बसलेल्या झाडावरून खाली आल्यावर प्रत्येक वेळी कोकिळेने आवाज करणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘२२.७.२०२२ या दिवशी सकाळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि मी चालण्याचा व्यायाम करत होतो. आम्ही एका उद्यानात गेल्यानंतर ज्या मार्गाने चालत होतो, त्या मार्गावरील एका झाडावर कोकिळा बसली होती. आम्ही उद्यानात फेर्‍या मारत असतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्या झाडाखाली आल्या की, ती ‘कुहु कुहु’ असा आवाज करत असे. प्रथम मला वाटले, ‘ती नेहमीप्रमाणे आवाज करत असेल’; मात्र फेर्‍या मारतांना आम्ही परत त्या झाडाखाली आलो की, ती आवाज करत असे. आमच्या प्रत्येक फेरीच्या वेळी असे होत होते.

२. कोकिळेला दैवी दर्शन होण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी फिरायला जाण्याचे नियोजन अकस्मात् करणे

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

कोकिळेला झालेला आनंद पाहून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘कोकिळा किती आनंदी झाली आहे ! तिलाही सूक्ष्मातील कळते.’’ कोकिळेला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील देवत्व लक्षात आलेले पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. कोकिळा तिच्या भाषेत आमच्याशी बोलत होती. नंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आज चालायला जाऊया’, असे मला का वाटले ?’, त्याचे कारण आता माझ्या लक्षात आले. आज मला या कोकिळेचे दर्शन होणार होते.’’ प्रत्यक्षात श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ खोलीत योगासने करत असतात; पण त्या दिवशी त्या मला अकस्मात् म्हणाल्या, ‘‘आज मी फिरायला येते.’’

३. दुसर्‍या दिवशी उद्यानात गेल्यावर ‘कोकिळा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची वाट पहात आहे आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ न आल्याने कोकिळा त्यांची विचारपूस करत आहे’, असे साधकाला जाणवणे

दुसर्‍या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना थकवा असल्यामुळे त्या चालायला आल्या नाहीत. मी उद्यानात चालत असतांना कोकिळा कालच्याच ठिकाणी झाडावर बसून मी आलो की, आवाज करत होती. मी तिच्याकडे एक-दोन वेळा पाहून चालायला लागलो. नंतर मी तिच्याकडे दुर्लक्ष करून चालत होतो. हे कोकिळेच्या लक्षात आले असावे. ती दुसर्‍या अल्प उंचीच्या आणि मला ती सहज दिसेल अशा झाडावर येऊन बसली. मी जवळ आलो की, ती मोठ्याने आवाज करायला लागली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘ती आज श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ का आल्या नाहीत ?’, असे विचारत आहे. आजही तिला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन घ्यायचे आहे.’ तिच्या आवाजात तो भाव जाणवत होता. मी मनातूनच तिला सांगितले, ‘आज श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना थकवा असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.’

प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुमच्या कृपेमुळे मला या प्रसंगाचे साक्षीदार होता आले. ‘पशू-पक्षी जिवातील अवतारी तत्त्वाला कसे ओळखतात !’, हे मला अनुभवायला आणि शिकायला मिळाले. प.पू. गुरुदेव आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई, तामिळनाडू. (२०.८.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक