सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदाल यांना हिजबुल मुजाहिदीनने दिली जिवे मारण्याची धमकी !
पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू महंमद रिझवानच्या (Mohammad Rizwan) विरोधात तक्रार प्रविष्ट केल्याचे प्रकरण
नवी देहली – श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट संघांमध्ये भाग्यनगर येथे झालेल्या सामन्याच्या वेळी पाकचा खेळाडू महंमद रिझवान याने मैदानावरच नमाजपठण केले होते. या कृत्याच्या विरोधात येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदाल Vineet Jindal यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. त्यावरून त्यानां हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याने भ्रमणभाष करून जिवे मारण्याची धमकी दिली. अधिवक्ता जिंदाल यांनी ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या विरोधातही देहली पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. याची माहिती त्यांनी ‘एक्स’द्वारे प्रसारित केली आहे.
कल से कोई धमाके में उड़ाना चाहता है कोई गोली से मारना चाहता है कोई ज़िंदा जलाना चाहता है मुझे।
— Adv.Vineet Jindal (@vineetJindal19) October 16, 2023
संपादकीय भूमिका
|