सातारा येथील शिक्षकाला धर्मांध पालकाकडून अमानुष मारहाण !
सातारा, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील शिक्षक श्री. विजय गुरव यांना एका धर्मांध विद्यार्थ्याच्या पालकांनी मारहाण केली. गंभीर घायाळ झालेल्या गुरव यांना उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
श्री. विजय गुरव हे इयत्ता ६ वीमध्ये इंग्रजी विषय शिकवतात. ६ वीमधील बागवान नावाच्या विद्यार्थ्याचे वर्तन वर्गाशी सुसंगत नव्हते. तो सातत्याने वर्गात असतांना हातवारे करत होता. त्याला गुरव यांनी समज दिली होती, तसेच मुख्याध्यापकांकडेही तक्रार केली होती. गुरव यांनी विद्यार्थ्याच्या पालकांना हा प्रकार सांगून शाळेमध्ये चर्चेसाठी बोलावले होते. याचाच राग मनात धरून विद्यार्थ्याच्या पालकाने ‘त्या शिक्षकाला समजावून सांगा. अन्यथा त्याला मार खावा लागेल’, अशी चेतावणी दिली होती. (अशा पालकांना चर्चेसाठी शाळेत न बोलावता पोलिसांच्या स्वाधीन करणेच योग्य ! – संपादक) १७ ऑक्टोबर या दिवशी अचानक विद्यार्थ्याचे वडील आणि त्यांचे मित्र शाळेत आले अन् त्यांनी श्री. गुरव यांच्याशी वाद घालण्यास प्रारंभ केला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. काही शिक्षकांनी मध्यस्थी करून मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र मारहाण करणारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
शाळा समितीचे अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी यांनी निषेध करून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिका
|