पाकिस्तान सैन्याच्या गोळीबारात भारताचे २ सैनिक घायाळ
वर्ष २०२१ च्या शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भारत आणि पाक सीमेवर पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपाचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोन्ही देशांमध्ये वर्ष २०२१ मध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या करारानंतर त्याच्या उल्लंघनाची ही पहिलीच घटना आहे.
#WATCH | Two injured BSF personnel were brought to a hospital in Jammu
Two BSF personnel received bullet injuries after Pak Rangers resorted to unprovoked firing towards BSF troops https://t.co/NiqoVfVOHH pic.twitter.com/fpJefc9456
— ANI (@ANI) October 18, 2023
सैन्याच्या अधिकार्यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाचे सैनिक विजेच्या खांबावर चढून दिवे लावत होते, तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला.
संपादकीय भूमिकापाकिस्तानने यापूर्वीही अशाच प्रकारच्या कराराचे नेहमीच उल्लंघन केले होते. पाकवर भारत कधीही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे भारतानेही या कराराचे पालन करण्याची आवश्यकता नाही ! |