गाझातून पलायन केलेल्यांना शरण देण्याचे स्कॉटलंडच्या मुसलमान राष्ट्रप्रमुखांचे आवाहन !
एडिनबर्ग (स्कॉटलंड) – स्कॉटलंडचे पाकिस्तानी वंशाचे मुसलमान राष्ट्रप्रमुख (फर्स्ट मिनिस्टर) हमजा यूसुफ यांनी म्हटले की, (इस्रायलद्वारे केले जात असलेले) आक्रमण अशा प्रकारे चालू ठेवू दिले जाऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले की, जर ब्रिटन सरकार इस्रायल-गाझा युद्धामुळे पलायन करणार्यांचे साहाय्य करण्याची योजना बनवत असेल, तर आम्ही गाझातील शरणार्थींचे स्वागत करू. आम्ही गाझाच्या घायाळ झालेल्या नागरिकांवर स्कॉटिश रुग्णालयांत उपचार करू. त्यांच्या या प्रतिक्रियेवर स्कॉटलंडच्या नागरिकांनी यूसुफ यांच्या भूमिकेविषयी नापसंती व्यक्त केली आहे.
Scotland’s First Minister Humza Yousaf calls for a worldwide refugee scheme for the displaced people of #Gaza
👉 Be it 2014-15 destruction of #Syria by the Islamic State or the ongoing Gaza-Israel conflict. No Muslim Nation entertains refugees from these war stricken countries,… pic.twitter.com/HjOjyLgBza
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 18, 2023
यूसुफ पुढे म्हणाले की, माझे मेहुणे गाझा शहरात डॉक्टर असून ते मला तेथील परिस्थितीची माहिती करून देत आहेत. ते तेथील भयावहता आणि नरसंहार पहात आहेत.
गाझातून पलायन केलेल्या १० लाख लोकांचे साहाय्य करण्यासाठी जगाने एक वैश्विक शरणार्थी कार्यक्रम चालू केला पाहिजे. हमासकडून केलेल्या कृत्यांची निंदा केली पाहिजे, तसेच ओलीस ठेवण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांनाही मुक्त केले पाहिजे.
संपादकीय भूमिकावर्ष २०१४-१५ च्या काळात सीरियामध्ये इस्लामिक स्टेटने केलेले आक्रमण असो अथवा आता इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध; अशा प्रकारे कोणताही इस्लामी देश शरणार्थी मुसलमानांचे स्वागत करण्यास उत्सुक नसतो. ख्रिस्ती राष्ट्रांतील मुसलमान राज्यकर्ते मात्र असे आवाहन प्राधान्याने करतात. हा भेद लक्षात घ्या ! |