बांगलादेशी घुसखोरांना भारतात वसवणार्या टोळीला अटक
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने ३ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण मानवी तस्करी करत होते. बांगलादेशींना भारतात आणून वसवण्यासाठी त्यांना विदेशातून २० कोटी रुपये देण्यात आले होते. त्यांच्या बँक खात्यांतून दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आदिल महंमद अशर्फी उपाख्य आदिल उर रहमान, शेख नजीबुल हक आणि अबू हुरायरा गाजी अशी या तिघांची नावे आहेत.
१. आतंकवादविरोधी पथकाने सांगितले की, मानव तस्करी करणारे बांगलादेशींना भारतात आणून वसवण्यासाठी ते भारतीय नागरिकत्वाची खोटी कागदपत्रे बनवत होते. त्यासाठी त्यांना विदेशातून अर्थपुरवठा करण्यात येत होता. यांतील आदिल या मुख्य सूत्रधार होता. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले. बनावट कागदपत्रांसाठी त्याला बंगालमध्ये रहाणार्या शेख नजीबुल हक आणि अबु हुरायरा गाजी यांनी साहाय्य केले.
२. या चौकशीत विदेशातील काही खासगी संस्थांकडून मदरसे आणि शाळा यांना अर्पण स्वरूपात २० कोटी रुपये पाठवण्यात आले होते, हे समोर आले. याचा वापर मानव तस्करीसाठी केला जात होता.
संपादकीय भूमिकाअशांना सरकारने फाशीची शिक्षा दिल्यावरच अशा घटना थांबतील ! |