फातोर्डा (गोवा) येथे ईदच्या मिरवणुकीत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने : पोलिसांकडून गुन्हा नोंद
मडगाव, १७ ऑक्टोबर (वार्ता.) : येथे ईद ए मिलादच्या दिवशी काढलेल्या मिरवणुकीत काही जणांकडून हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करण्यात आली. या प्रकरणी प्रसारमाध्यमांतून चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर फातोर्डा पोलिसांकडून संबंधित वाहनचालकासह इतरांवर धार्मिक तेढ निर्माण होण्यासारखी विधाने करण्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी काळजी न घेता वाहन चालवणे, दुसर्या धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, तसेच धमकी देणे या गुन्ह्यांखाली पोलिसांनी संशयितांच्या िवरोधात गुन्हा नोंद केला आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार फातोर्डा येथील रवींद्र भवन सर्कलजवळ ईदच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत एका ‘थार’ या चारचाकी गाडीमध्ये मोठ्या आवाजात हिंदूंना वाईट वाटू शकेल, असे वादग्रस्त आशय असलेली गाणी लावलेली होती आणि त्या गाडीवर बसलेले मुसलमान युवक चेतावणी दिल्यासारखे हातवारे करत होते. त्यांच्याकडूनही घोषणा दिल्या जात होत्या. यानंतर फातोर्डा पोलिसांनी संबंधित चित्रफितीच्या आधारे गाडीचा क्रमांक शोधून काढून वाहनाच्या मालकासह इतरांवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गावकर अन्वेषण करत आहेत. (हिंदूंनी केवळ गुन्हा नोंद झाल्याविषयी समाधान न मानता संबंधितांना अटक होऊन न्यायालय त्यांना दोषी ठरवेपर्यंत पाठपुरावा घ्यावा ! अशी प्रकरणे कालांतराने मिटवली जाण्याचीही शक्यता असते ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|