‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चा २३ लाख नागरिकांकडून लाभ !
मुंबई – ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चालू होऊन वर्ष झाले आहे. वर्षभरामध्ये २३ लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये ‘आपला दवाखान्यां’ची संख्याही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
‘आपला दवाखाना’मध्ये विनामूल्य वैद्यकीय पडताळणी, औषधोपचार यांसह रक्त चाचण्यांची सेवा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विशेष तज्ञांच्या सेवाही पॉलीक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.