गरब्याची चित्रे उघड्या पाठीवर नकोत !

देहाचे प्रदर्शन करणे’, हेच बर्‍याच जणींना भूषणावह वाटते आणि हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत !

आता नवरात्रोत्सव चालू आहे. आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु युवतींनी पाठीवर देवीचे किंवा गरबा खेळतांनाचे चित्र रंगवून घेतलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होतांना दिसत आहेत. हिंदु धर्मात ‘स्त्री’ला देवी, माता यांच्या रूपात पहाण्याचे संस्कार आहेत. भारतीय महिलांनी सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा इतिहास घडवला आहे. त्यांनी प्राणांचे बलीदान दिले; पण आपल्या देहाची विटंबना होऊ दिली नाही. असे असले, तरी आज आपण काय पहातो ? ‘देहाचे प्रदर्शन करणे’, हेच बर्‍याच जणींना भूषणावह वाटते. युवती त्यांच्या पाठीवर देवीचे छायाचित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. ‘ज्या देशातील सहस्रो राजपूत स्त्रियांनी जोहार केला, त्याच देशातील महिला अशा प्रकारे अंगप्रदर्शन करून मुसलमानांना त्यांची उघडी पाठ गरब्याची चित्रे रंगवण्यासाठी देत आहेत’, हे बघून पुष्कळ दुःख वाटते. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ? त्यांना धर्मशिक्षण आणि धर्माचा इतिहास न शिकवला गेल्यामुळेच धार्मिक उत्सवांतील असे अपप्रकार वाढले आहेत.

या अपप्रकारातूनच या युवती ‘लव्ह जिहाद’मध्ये फसण्याचीही शक्यता अनेक पटींनी वाढते आणि हिंदु युवतींना फसवण्याचे हे चक्र चालू होते. अशा वेशभूषेत सार्वजनिक ठिकाणी वावरल्यामुळे तिथे असणार्‍या लहान, तसेच अन्य मुलींच्या मनावर अयोग्य चित्र कोरले जाते. ‘आपणही असे करावे’, हा अयोग्य विचार प्रबळ होतो. आध्यात्मिक स्तरावर पाहिले, तर अशा प्रकारे वागणारी व्यक्ती देवतेची अवकृपा ओढवून घेत असते, तसेच वातावरणात निर्माण झालेल्या भक्तीमय तरंगांमध्ये व्यत्यय निर्माण करत असते. देवता हिंदूंसाठी ऊर्जास्रोत आहेत. सणांच्या कालावधीत देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्याने ऊर्जा मिळण्याचे प्रमाणही अधिक असते. मुळात ‘गरबा नृत्य’ म्हणजे ‘देवीची उपासना’ करण्याचे माध्यम आहे. उपासना योग्य पद्धतीने झाली, तर त्यातून आपल्याला सामर्थ्याची प्राप्ती होत असते. त्यासाठी धर्मशिक्षण घेऊन कृती करणे आवश्यक आहे. यासाठी अशा प्रकारच्या नृत्याचे आयोजन करणार्‍या सार्वजनिक मंडळांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. गरबा नृत्यात सहभागी होणार्‍यांचे प्रबोधन करायला हवे. त्यांना शास्त्र सांगून सणाचे पावित्र्यही राखले जाईल, या दृष्टीने नियोजन करायला हवे !

– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी‘