इस्रायलचे ‘एकता सरकार’ आणि भारतातील राष्ट्रघातकी विरोधी पक्ष !
‘इस्रायल आणि ‘हमास’ ही पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटना यांच्यात युद्ध चालू असून ते सगळ्या जगासाठी चिंतेचे झाले आहे. या युद्धात काही राष्ट्रांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला, तर मुसलमान राष्ट्रांनी हमासची पाठराखण केली आहे. भारत सरकारने इस्रायलला अधिकृतपणे प्रथमच पाठिंबा दर्शवला आहे.
या युद्धामध्ये हमासच्या युद्धखोरीला तोंड देण्यासाठी इस्रायलमध्ये आपत्कालीन ‘एकता सरकार’ची स्थापना करण्यात आली आहे. यात आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचा समावेश असतो. ते आपत्कालीन परिस्थितीविषयी चर्चा करून एकमुखाने निर्णय घेतात. त्यांचा उद्देश ‘हमासने केलेले आक्रमण परतवण्यासह हमासची पाळेमुळेही खणून काढणे’, हा आहे.
१. …तर विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या अधिकृत भूमिकेचे समर्थन करील का ?
आजवर जेव्हा जेव्हा इस्रायल-पॅलेस्टाईन वाद उफाळून आला, तेव्हा तेव्हा भारतात सर्वाधिक काळ सत्तेवर असणार्या काँग्रेसच्या सरकारांनी पॅलेस्टाईनलाच पाठिंबा दिला. काँग्रेस करत असलेल्या मुसलमानांच्या लांगूलचालनाचाच तो एक भाग आहे. आताही भारत सरकारने इस्रायलला अधिकृत पाठिंबा दर्शवल्यानंतर काँग्रेसने पॅलेस्टाईनची पाठराखण केली आहे. भारतामध्ये रहाणार्या मुसलमानांसह असे अनेक गट आहेत की, जे प्रतिदिन उघड उघड पॅलेस्टाईनच्या बाजूने मतप्रदर्शन करत आहेत. अर्थातच मुसलमानांचा अनुनय करणे, हेच त्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे.
प्रश्न हा नाही की, त्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा द्यावा कि नाही ? तर ‘आज इस्रायलमध्ये असलेली परिस्थिती भारतात उद्भवली, तर काँग्रेस किंवा देशातील अन्य विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या अधिकृत भूमिकेचे समर्थन करतील का ? युद्धजन्य परिस्थितीत ते देशाच्या बाजूने उभे रहातील किंवा वक्तव्ये करतील का ?’, हा आहे.
२. भारतात युद्धजन्य स्थिती उद्भवल्यास देशात अराजकसदृश स्थितीची शक्यता !
भारताने पाकिस्तानमधील आतंकवाद्यांवर केलेली सशस्त्र कारवाई असो, हवाई आक्रमण करून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे असो किंवा लडाखमध्ये चिनी सैनिकांशी भारतीय सैनिकांची झालेली झटापट असो; प्रत्येक वेळी भारतातील विरोधी पक्षांनी देशहिताच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांनी पाकिस्तान किंवा चीनचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वक्तव्ये केली. देशहितासाठी एकत्र येणे दूरच; पण त्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य दले यांनाच आरोपींच्या पिंजर्यात उभे करून पुरावे मागितले.
अशा स्थितीत ‘भारतात उद्या युद्धजन्य स्थिती उद्भवली आणि देशांतर्गत शत्रूंनी यादवी युद्धास आरंभ केला, तर हे विरोधी पक्ष भारताच्या बाजूने उभे रहातील का ? मुसलमानांनी उद्या पाकिस्तानच्या समर्थनार्थ देशात दंगली चालू केल्या, तर हे पक्ष हिंदूंच्या पाठीशी कितपत उभे रहातील ?’, असे प्रश्न पडतात. भारत आज शत्रूराष्ट्रांनी वेढला गेला आहे. भारताची मित्रराष्ट्रेही चीनसारख्या धूर्त राष्ट्राच्या कारस्थानांना भुलून भारताशी शत्रूत्व पत्करत आहेत. अशा स्थितीत भारत युद्धाच्या खाईत लोटला गेल्यास भारतीय नागरिक म्हणून एक होण्याऐवजी शत्रूराष्ट्राचे फावेल, अशी भूमिका घेतली गेली, तर देशाला पुन्हा पारतंत्र्याचे दुःख भोगावे लागेल.
३. देशहिताला प्राधान्य देण्याची आवश्यकता !
हिंदूच या देशाचे खरे हितचिंतक असल्याने त्यांना देशाच्या आणि पर्यायाने स्वतःच्या रक्षणासाठी संघटित होण्याला पर्याय नाही ! अन्यथा २ सहस्र वर्षे ज्यू धर्मियांनी जे भोगले, ते हिंदूंच्या वाट्याला आल्यास त्यांच्या हालअपेष्टांना अंत रहाणार नाही. असे झाले, तर काळ हिंदूंना क्षमा करणार नाही ! म्हणून हिंदूंनो संघटित व्हा ! देशहिताला प्राधान्य द्या !! (१५.१०.२०२३)
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.