योग आणि विज्ञान
१. मानवाचा परमात्मा बनवणे, हेच योगाचे उद्दिष्ट असणे
‘योगशास्त्र विश्वात धुमाकूळ घालणार नाही. तसा त्याला तो घालता यायचाही नाही. योगालाही काही मर्यादा आहेत. नियतीला धरूनच याेगशास्त्राचा उपयोग करायचा आहे. मानवाचा परमात्मा बनवणे, हेच योगाचे उद्दिष्ट आहे.
२. योग ही अशी चीज आहे की, त्यामुळे पश्चिमेच्या विज्ञानाला भारतीय योगाच्या चरणांशी नमूनच वागावे लागेल. योग हा वैदिक हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृतीची आधारशीला आहे.
३. योग्याला विज्ञानाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नसणे
योगी पंतजलीच्या ध्यान, धारणा आणि समाधी यांद्वारे संयम साधून विज्ञानातील कोणतेही प्रमेय जाणू शकतो. त्याकरता त्याला विज्ञानाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. तो ध्यान, धारणा आणि समाधी यांद्वारे संशोधन करील. योग्याची प्रयोगशाळा, म्हणजे त्याचे अंतर्मन, तर वैज्ञानिकाची प्रयोगशाळा, म्हणजे बाह्य विश्वातील वैज्ञानिक उपकरणे आणि सामुग्री आहे.
४. योग हे मानवी जीवनाचे समग्र चिंतन आहे. इंद्रियांच्या अतीत असणार्या शाश्वत समाधी, आनंद, अमृतत्त्व यांसाठी योगाचा विनियोग आहे. योग ही वैदिकांची प्रज्ञा आहे.
५. संपूर्ण यम नियमादी अंगी बाणवून ध्यानाचा सातत्याने अभ्यास होणे, हे आजच्या काळात अशक्य आहे; पण शरीर आणि मन यांची थोडी सिद्धता करून अन् महायोग्याचे शिष्यत्व पत्करून, त्यांच्या प्रयोगशाळेचा लाभ करून घ्यायचा, हेच आजच्या काळात योग्य राहील.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०२३)