चालत्या रिक्शात गळा चिरून प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करणारा अटकेत !

मुंबई येथील प्रकार ! 

मुंबई – भांडुपमध्ये चालत्या रिक्शात प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरून हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आरोपी प्रियकर चेतन गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमसंबंधाला नकार दिल्याच्या रागात चेतन याने प्रेयसीला खासगी व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत एका उपाहारगृहात नेले. तिच्यासमवेत बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले आणि घरी परततांना चालत्या रिक्शात त्याने चाकूने तिच्या मानेवर वार केले. तिची प्रकृती स्थिर आहे.

संपादकीय भूमिका

प्रेमात हिंसा आणून क्रौर्याची परिसीमा गाठणारी युवा पिढी !