पाकच्या माजी पंतप्रधानांच्या जावयाची भारत आणि इस्रायल यांच्या विरोधात अणूबाँब वापरण्याची धमकी !
मुसलमानांना ‘गझवा-ए-हिंद’साठी (काफीरांना ठार करण्याच्या युद्धासाठी) सिद्ध रहाण्याचे केले आवाहन !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई कॅप्टन (निवृत्त) सफदर यांनी भारत आणि इस्रायल यांच्या विरोधात उघडपणे गरळओक केली आहे. त्यांनी भारत आणि इस्रायल यांच्या विरोधात अणूबाँब वापरण्याची धमकी दिली आहे. मुसलमानांना ‘गझवा-ए-हिंद’साठी (काफीरांना ठार करण्याच्या युद्धासाठी) सिद्ध रहाण्यास सफदर यांनी सांगितले आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथे ‘जमियत-ए-उलेमा इस्लाम’ या पक्षाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. काश्मीर आणि पॅलेस्टाईन यांच्याप्रश्नी त्यांनी भारत आणि इस्रायल यांच्यावर टीका केली. या सभेमध्ये इस्रायलवर आक्रमण करणार्या हमासच्या २ आतंकवादी नेत्यांनीही मार्गदर्शन केले.
पाकिस्तानचे अणूबाँब सर्व मुसलमानांचे !
सफदर पुढे म्हणाले की, पाकिस्तानने बनवलेलेे अणूबाँब सर्व मुसलमानांचे आहेत. पॅलेस्टाईनमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. गाझामध्ये लोकांना ठार मारले जात आहे. मुसलमानांना जिहादसाठी सिद्ध रहावे लागेल आणि गाझातील मुसलमानांना समर्थन द्यावे लागेल.
संपादकीय भूमिकाखायला अन्न नाही आणि पाकचे नेते अणूबाँब वापरण्याची धमकी देत आहेत. याला विनाशकाळी बुद्धी भ्रष्ट होण्यासारखी स्थिती म्हणतात ! |