हमासने गाझा पट्टीमध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा प्रसारित केला व्हिडिओ !
तेल अविव (इस्रायल) – हमासने इस्रायलच्या ओलीस ठेवलेल्या नागरिकांपैकी एका तरुणीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात ही तरुणी घायाळ असून तिच्या हातावर उपचार करण्यात येत असल्याचे दिसत आहे. या तरुणीचे नाव मिया शेम असून ती इस्रायलच्या शोहम शहराची रहिवासी आहे. तिच्या तुटलेल्या हातावर गाझा येथील रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यात आले. तिचा हा व्हिडिओ कधी चित्रीत करण्यात आला, हे स्पष्ट झालेले नाही. या तरुणीच्या कुटुंबाने, इस्रायल सरकार अथवा संरक्षण दल यांच्या अधिकार्यांनी या व्हिडीओच्या सत्यतेला दुजोरा दिला नाही. तसेच ‘मिया अजूनही जिवंत आहे कि नाही?’, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडिओ प्रसारित करून हमास सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.
सौजन्य केटीएलए 5