गोवा : हणजुण आणि पेडणे समुद्रकिनार्यांवर होणारे ध्वनीप्रदूषण !
समुद्रकिनार्यांवर ध्वनीप्रदूषण करणार्या आस्थापनांना टाळे ठोकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !
म्हापसा, १६ ऑक्टोबर (वार्ता.) : समुद्रकिनार्यांवर पार्टीच्या वेळी मोठ्या आवाजात संगीत लावून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनांतील साहित्य कह्यात घेऊन त्यांना टाळे ठोकावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वीही न्यायालयात प्रविष्ट केलेल्या विविध याचिकांच्या वेळी उच्च न्यायालयाने असा आदेश दिला होता; पण या भागातील ध्वनीप्रदूषणाची समस्या नियमितचीच असून ती सुटलेली नाही.
यासंबंधी न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, पोलीस आणि ध्वनी प्रदूषणाविषयी निरीक्षण करणारे इतर अधिकारी यांनी हणजुण आणि पेडणे समुद्रकिनार्यांवर आकस्मिक भेट देऊन ‘ध्वनीप्रदूषण होते का ?’ याविषयी पडताळणी करावी आणि यासंबंधीचा अहवाल सादर करावा. हणजुण आणि पेडणे पोलीस ठाण्यांच्या कक्षेत येणार्या भागात या अधिकार्यांनी पोलिसांच्या साहाय्याने पडताळणी करावी. विशेष करून शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या वेळी ही पडताळणी करावी आणि याचा अहवाल न्यायालयाला द्यावा.
या भागातील हॉटेल्समध्ये रात्रीच्या वेळी पार्ट्या होत असल्याने ध्वनीप्रदूषण होत असते, अशी स्थानिक लोकांची तक्रार आहे.
संपादकीय भूमिका
|