सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्यांच्या विरोधात अकोला, नाशिक आणि यवतमाळ पोलीस ठाण्यांत तक्रार प्रविष्ट !
द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
अकोला – सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’चा (द्वेषपूर्ण वक्तव्याचा) गुन्हा नोंदवा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली आहे. हिंदुत्वनिष्ठांनी अकोला येथील खदान पोलीस ठाण्यात याविषयी पोलीस तक्रार केली आहे .या वेळी ठाणेदार श्री. धनंजय सायरे यांनी तक्रार स्वीकारली. ‘सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्यांना त्वरित अटक करावी’, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. यावर अकोला पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ‘पोलिसांकडून कारवाई झाली नाही, तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी याचिका प्रविष्ट करण्यात येईल’, अशी चेतावणीही तक्रारीत देण्यात आली आहे. ही तक्रार देतांना विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.
अकोला येथील शिवसेनेचे महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, हिंदु जनजागृती समितीचे अमोल वानखेडे आणि अश्विनी सरोदे, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या श्रुती भट, ‘राष्ट्र जागृती मंचा’चे अध्यक्ष संजय ठाकूर, अधिवक्ता मुकुंद जालनेकर, अधिवक्ता सुनील नारखेडे, ‘भारत स्वाभिमान’चे प्रशांत पाटील, मराठा समाज मढी संस्थानचे कैलास रणपिसे, सनातन संस्कृती महासंघाचे हेमंत जकाते, नरेंद्र करावे, करणी सेनेचे मयूर मिश्रा, शिवसेनेचे नगरसेवक शशी चोपडे, तसेच अन्य धर्मप्रेमी रत्नदीप गणोजे, फुलचंद्र मौर्य, विजयानंद तोतरे, यशवंत पिसे, नीता सोनवणे आदी उपस्थित होते. या वेळी काही अधिवक्त्यांचीही विशेष उपस्थित होती.
नाशिक – येथे वरील विषयाच्या संदर्भातच ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. किसन गांगुर्डे यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्यात १४ ऑक्टोबर या दिवशी तक्रार दिली. ही तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी स्वीकारली. या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे विकास थोरात, धर्मप्रेमी ऋषिकेश ब्रह्मपुरीकर, पवन गुरव, सचिन अभाळे, अमित हंबर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. अमोल शिंदे, प्रदीप देशमुख, संदीप वाघ, धर्मप्रेमी अमोल कुलकर्णी, कु. रागेश्री देशपांडे, निखिल अहिरराव उपस्थित होते. या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले.
यवतमाळ – येथे तक्रार देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सागर लुटे, प्रदीप चौधरी, आशिष फाळके, पतंजली योग पिठाचे श्री. संजय सांभारे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक प्रफुल्ल टोंगे, श्री. विजय जाधव, सनातन संस्थेचे श्री. विष्णुपंत खाडे, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सर्वश्री सूरज गुप्ता, प्रसाद वाजपेयी, राम राठोड, अंकुश पांडे, अभिषेक श्रीवास यांच्यासह ३० धर्मप्रेमी उपस्थित होते.