‘हमास’चा संस्थापक नेता खालिद मेशाल याने जगभरातील मुसलमानांना केलेले जिहादी आवाहन !
‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा संस्थापक नेता खालिद मेशाल याने भाषण करत जगातील सर्व मुसलमानांना खालील गोष्टी करण्याचे आवाहन केले आहे.
१. पुढील शुक्रवारी सर्व मुसलमान राष्ट्रांमध्ये, तसेच सर्व देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांनी स्वतःचा राग व्यक्त करावा. त्याने या शुक्रवारला ‘द फ्रायडे ऑफ अल अक्सा फ्लड’, असे नाव िदले असून ‘यामुळे ज्यू आणि अमेरिका यांना योग्य तो संदेश जाईल’, असे त्याने म्हटले आहे.
२. त्याने जगातील सर्व मुसलमान देशांकडून आर्थिक साहाय्याची मागणी केली असून त्याला ‘आर्थिक जिहाद’ असे नाव दिले आहे. ‘गाझामध्ये लढणार्यांना त्यांचा सर्वनाश होण्यापासून वाचण्यासाठी आर्थिक साहाय्य केले पाहिजे’, असे त्याचे म्हणणे आहे.
३. तसेच त्याने ‘मुसलमान नेते आणि राष्ट्रे यांनी इस्रायलचे आक्रमण रोखण्यासाठी राजकीय दबाव आणावा’, असे आवाहन केले आहे.
४. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खालिद याने जगातील सर्व मुसलमानांना ‘त्यांच्या जीवानिशी जिहाद करून ‘अल अक्सा’साठी हुतात्मा व्हावे’, असे आवाहन केले आहे. ‘सर्व मुसलमानांनी ज्यूंविरुद्ध लढावे’, अशी त्याची इच्छा आहे. तो म्हणतो, ‘‘इस्रायलच्या शेजारी असलेल्या देशातील, म्हणजे जॉर्डन, सीरिया, लेबनॉन आणि इजिप्त या देशातील मुसलमानांनी इस्रायलच्या सीमेवरून इस्रायलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करावा. केवळ सिद्धांतावर विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ आहे. पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्त सांडण्यासाठी मुजाहिदीनांनी (जिहादसाठी लढणार्यांनी) मोठ्या संख्येने तिथे जावे. पैसा हा महत्त्वाचा आहे; परंतु आज तुमचे रक्त आणि जीव पॅलेस्टाईनसाठी देण्याचे आम्ही आवाहन करत आहोत.’’
(खालिद मेशाल याने केलेल्या आवाहनावर भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी म्हणवणारे, बुद्धीजीवी, सर्वधर्मसमभाववाले, मानवाधिकारवाले, तसेच निधर्मी लोकप्रतिनिधी काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या ! त्यांच्या दृष्टीने हे सामाजिक युद्ध आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे, हे जाणा ! अशा प्रकारचे आवाहन जर हिंदुत्वनिष्ठ नेत्याने केले असते, तर एव्हाना भारतासह जगभरातील हिंदुद्वेष्टे, बुद्धीजीवी, सर्वधर्मसमभाववाले आणि मानवाधिकारवाले यांनी आगपाखड केली असती ! – संपादक)
(साभार : ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सामाजिक माध्यमावरून’)