श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे चैतन्य मिळावे, यासाठी त्यांनी दिलेल्या साडीच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !

 ‘वर्ष २०१८ मध्ये मला विविध आध्यात्मिक त्रास होत होते. तेव्हा ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे चैतन्य मला अखंड लाभावे’, यासाठी मी त्यांच्याकडे त्यांची एक साडी मागितली होती. त्याप्रमाणे त्यांनी मला त्यांची एक साडी दिली. त्यांनी साडी देण्यापूर्वी मला झालेले त्रास आणि साडी दिल्यावर त्या साडीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून साडी मिळण्यापूर्वी होत असलेले आध्यात्मिक त्रास !

अ. रात्री झोपतांना ‘माझ्या सभोवताली कुणीतरी वावरत आहे’, असे मला जाणवत असे.

आ. माझ्या अंगावर १० ते १५ किलो वजनाचे पोते ठेवल्याप्रमाणे वजन जाणवायचे आणि मला सकाळी उठताही येत नसे.

इ. काही वेळा ‘कुणीतरी माझा गळा दाबत आहे; पण माझा आवाज निघत नाही’, असे व्हायचे.

ई. रात्री डोळ्यांपुढे चित्रविचित्र चेहरे दिसून मला झोप येत नसे. त्यानंतर मला दिवसभर थकवा आणि ग्लानी येत असे.

२. साडी मिळाल्यानंतर आलेल्या त्रासदायक अनुभूती !

अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे चैतन्य मिळण्यासाठी त्यांनी दिलेली साडी मी रात्री झोपतांना अंगावर पांघरूण म्हणून घेतली. तेव्हा माझे हात दुखू लागले.

आ. ती साडी अंगावर घेतल्यावर मला पुष्कळ ओझे जाणवून माझ्या छातीत धडधडू लागले. काही वेळातच मला घाम फुटला आणि माझे डोके सुन्न झाले.

इ. साधारण अर्ध्या घंट्याने मला हलके वाटून शांत झोप लागली. तेव्हा ‘मला त्रास देणारी वाईट शक्ती आणि साडीतील चैतन्य यांचे सूक्ष्मातून युद्ध झाल्याने मला वरील त्रास झाले’, याची मला जाणीव झाली.

३. चांगल्या अनुभूती !

अ. यापूर्वी मला माझ्या सभोवताली वाईट शक्ती असल्याचे जाणवत असे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची साडी मिळाल्यावर हळूहळू काही दिवसांनी हा त्रास उणावला.

आ. काही दिवसांनी ‘साडी अंगावर घेतल्यावर माझ्या देहापासून १ फूट अंतरापर्यंत दैवी चैतन्याचे कवच निर्माण झाले आणि त्यामुळे मला होणारे त्रास उणावले’, असे मला जाणवले.

इ. ‘साडी अंगावर पांघरल्यावर मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कुशीत चैतन्यात झोपले आहे’, असे मला जाणवले.

ई. एक-दीड मासानंतर माझ्या त्रासाची तीव्रता उणावली. तेव्हा मी ती साडी अंगावर पांघरण्याऐवजी डोक्याजवळ ठेवून झोपत असे. त्यामुळे मला शांत झोप लागायची.

४. पुन्हा त्रास होऊ लागल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेला उपाय !

२ – ३ मासांनंतर मला पुन्हा त्रास होऊ लागले. त्याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘ठराविक कालावधीने साडी धुऊन उन्हात वाळवत जा, म्हणजे त्यावरील वाईट शक्तींचे आवरण न्यून होऊन त्यातील चैतन्याचा तुम्हाला लाभ होईल.’’ त्याप्रमाणे केल्यावर माझे त्रासाचे प्रमाण उणावले.

५. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या साडीतील चैतन्याची कुटुंबीय आणि साधक यांना आलेली प्रचीती !

५ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या साडीच्या संदर्भात कुटुंबियांना आलेल्या अनुभूती : एकदा मी वैयक्तिक कामासाठी घरी गेले होते. तेव्हा मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची साडी माझ्या समवेत नेली होती. मी घरी त्या साडीविषयी कुणाला काही सांगितले नव्हते; परंतु जेव्हा मी ती साडी ‘बॅगे’तून बाहेर काढली, तेव्हा माझ्या वहिनीला सुगंध आला, तसेच माझ्या भाचीचा श्रीकृष्णाचा नामजप चालू झाला. आईला ‘ती साडी मऊ जाणवून तिच्यात चैतन्य आहे’, अशी अनुभूती आली.

५ आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या साडीकडे पाहून साधकांना आलेल्या अनुभूती : वर्ष २०२१ मध्ये मी वैयक्तिक कामासाठी संभाजीनगर येथे गेले होते. तेव्हा कोरोनाचा काळ होता. ‘आपल्याभोवती दैवी कवच रहावे’, या उद्देशाने मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दिलेली साडी एका पिशवीत घालून समवेत नेली होती.

१. मी तेथील साधकांना भेटले. तेव्हा साधकांना त्या पिशवीकडे पाहून ‘तिच्यात काहीतरी दैवी आहे’, असे जाणवले.

२. साधकांना ती साडी दाखवल्यावर ‘त्यांचा नामजप चालू होणे, श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची आठवण होणे, चैतन्य जाणवणे, त्यावर दैवी कण येणे आणि त्याकडे पाहिल्यावर ‘ॐ’ दिसणे’, अशा अनुभूती आल्या.

३. एकदा मी दत्तजयंतीनिमित्त असणार्‍या ग्रंथप्रदर्शन कक्षावर गेले होते. तेथेही साधकांना वरीलप्रमाणेच अनुभूती आल्या आणि ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ प्रत्यक्षात तेथे आल्या आहेत’, असे जाणवले. दत्तजयंतीच्या दिवशीच श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा वाढदिवस असल्याने ‘साडीच्या माध्यमातून त्याच आपल्याला भेटत आहेत’, असे साधकांना जाणवले.

‘गुरुदेव, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या साडीच्या रूपात मला आपले कृपाकवच लाभले. त्यामुळे माझे अनेकदा वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण झाले आहे अन् या त्रासातही मला आणि अन्य साधकांनाही दैवी अनुभूती आल्या. कधी सुगंध, तर कधी चैतन्य यांच्या रूपात अनुभूती दिलेल्या या वस्त्ररूपी प्रसादाबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (२६.५.२०२३)  

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.