रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ शाळांचा वीजपुरवठा केला खंडित

महावितरणची कारवाई

रत्नागिरी – वीजदेयकाचा भरणा न केल्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागांतील ४७ प्राथमिक शाळांची महावितरणने वीज खंडित केली आहे. वीजदेयकाचे ४ लाख २९ सहस्र २७० रुपये थकित असल्याने महावितरणकडून ही कारवाई
करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २ सहस्र ४९६ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज जोडणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५६ शाळांनी विविध कारणांमुळे वीजदेयक भरणा केलेले नाही. या शाळांनी सुमारे ६-७ महिने वीजदेयकच भरलेले नाही.

महावितरणने हे वीजदेयक माफ करावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समित्यांकडून शासनाकडे करण्यात आली आहे; मात्र महावितरणने वीजदेयक थकित ठेवणार्‍या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.