गाझावर ताबा मिळवणे मोठी चूक ठरेल ! – जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इस्रायलला इशारा
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला नष्ट करण्याचे सुतोवाच केले असून इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसले आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील १० लाख पॅलेस्टिनी नागरिकांना गाझा पट्टी सोडण्याचे आवाहनही केले आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला सतर्क केले आहे. बायडेन म्हणाले की, इस्रायलने गाझा पट्टीवर ताबा मिळवणे मोठी चूक ठरेल. याच पार्श्वभूमीवर बायडेन इस्रायलचा दौरा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘या दौर्यात ते नेतान्याहू यांच्याशी सखोल चर्चा करणार आहेत’, असे सांगितले जात आहे.
सौजन्य: 60 Minutes
‘सी.बी.एस्. न्यूज’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलतांना बायडेन म्हणाले की, इस्रायल युद्धनियमांनुसार काम करील आणि निर्दोष नागरिकांना औषधे, अन्न अन् पाणी पोचवेल. इस्रायलने दीर्घकाळ गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवू नये. त्याऐवजी हा भाग पॅलेस्टिनी प्राधिकरणाद्वारे शासित असावा. मला असे वाटते की, गाझामध्ये जे काही घडले, ते हमासने केले. ते पॅलिस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
संपादकीय भूमिका‘एकीकडे इस्रायलला शस्त्रसाठा पुरवून हमासच्या विरोधात लढण्यास प्रोत्साहित करणारी अमेरिका आता अशी भूमिका का घेत आहे ?’, असा प्रश्न पडणे साहजिक आहे ! |