मैसुरू (कर्नाटक) येथे पोलिसांच्या बंदोबस्तात साजरा करण्यात आला ‘महिषा दसरा’ !
भाजपने केला होता विरोध !
मैसुरू (कर्नाटक) – ‘महिषा दसरा नियोजन समिती’ने येथील समुदाय भवनाच्या प्रांगणात १४ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेला ‘महिषा दसरा’ आणि ‘धम्म दीक्षा कार्यक्रम’ पोलिसांच्या बंदोबस्तात साजरा झाला. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून सहस्रावधी लोक यामध्ये सहभागी होण्यासाठी येथे आले होते. ते महिषासुराचा जयजयकार करत होते. महिषा दसर्याला भाजपने विरोध केला होता. त्यामुळे शहरामध्ये जमावबंदी करण्यात आली होती.
या कार्यक्रमामध्ये उरीलिंग पेद्दी मठाचे ज्ञान प्रकाश स्वामीजी म्हणाले की, हत्येचा (देवीने महिषासुराचा वध केला, या कृतीचा) तुम्ही मानसन्मान करणार असाल, तर ज्याची हत्या झाली आहे, त्या आमच्या चक्रवर्तीचे (सम्राटाचे) आम्ही स्मरणही करू नये का ? मनुवाद्यांचे सण आणि त्यांचे देव आम्हाला नको. आम्हाला केवळ राज्यघटना हवी आहे. खुन्याला मनुष्य बनवणारा बौद्ध धर्म आमचा आहे. (बौद्ध धर्माच्या शिकवणीच्या विरुद्ध वागत हिंदु धर्माचा द्वेष करणारे कधीतरी जगात शांतता निर्माण करू शकतील का ? – संपादक) आम्ही आग लावणारे नाही, तर विझवणारे आहोत. (प्रत्यक्षात मात्र हिंदुद्वेषी विधानांद्वारे आग लावण्याचाच प्रयत्न चालू आहे, असेच जगाला दिसते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेष पसरवणार्यांना महिषासुरच प्रिय असणार, यात काय शंका ? असे लोक समाजात नैतिकता, प्रेम आणि सद्भाव कधीतरी निर्माण करतील का ? |