गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाची निदर्शने !
कोल्हापूर – गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी आणि घाऊक बाजारपेठ आहे. सध्या दसरा आणि दीपावली यांमुळे वस्तूंची विक्री आणि देवाणघेवाण वाढली आहे. याचसमवेत उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. असे असतांना महावितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली सतत भारनियमन होत आहे. याचा ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही त्रास होत आहे. या संदर्भात अडचण विचारल्यास वीज कर्मचारी उद्धट उत्तरे देतात, तसेच दुरुस्तीही वेळेत होत नाही. तरी ऐन सणांच्या कालावधीत महावितरणने ग्राहक आणि व्यापारी यांना त्रास देऊ नये, तसेच यांवर तात्काळ उपाययोजना काढावी यांसाठी गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाने निदर्शने केली. निदर्शने झाल्यावर साहाय्यक अभियंता अश्विनकुमार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले
या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विक्रम चौगुले, योगेश लोहार, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, दीपक धिंग, संजय काळूगडे, शिवाजी लोहार, नागेश शिरवाटे, सुनील पारपाणी यांसह अन्य उपस्थित होते.