तीन बांगलादेशी महिलांना अटक !
नवी मुंबई – येथील एका बारमध्ये काम करून कोपरखैरणेत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ३ बांगलादेशी महिलांना आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. काजोल शेख, तानिया मंडळ आणि राणू शेरअली शेख अशी त्यांची नावे आहेत. बांगलादेशातून विनापारपत्र वैध कागदपत्रांविना घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.