…अन् इस्रायलसम नरसिंह होऊया ।
हमास-इस्रायल युद्धाची ठिणगी पडली आहे ।
वाढत वाढत जाऊन ती वणवा पेटवू पाहे ॥ १ ॥
मानवी देहातील क्रूर असे हे वाघ, सिंह, अस्वल, लांडगे ।
आतंकवादी हे या भीषण संकटामागे ॥ २ ॥
हमास-इस्रायल युद्धाचा प्रारंभच भीषण आहे ।
शेवट त्याचा किती भीषण हे सांगणे कठीण आहे ॥ ३ ॥
हमाससम आतंकवादी म्हणजे नागरी वस्तीतील क्रूर पशू ।
संचार त्यांचा वाढेपर्यंत नका घरात शांत बसू ॥ ४ ॥
क्रूर सिंहास ठार मारण्या दुसराही क्रूर सिंह लागतो ।
हे आता लक्षात घेऊया अन् इस्रायलसम नरसिंह होऊया ॥ ६ ॥
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे), सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग (१०.१०.२०२३)