खलिफाचे इस्लामिक राज्य जगभरात स्थापन करणे हेच ‘हमास’चे उद्दिष्ट !
‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा संस्थापक शेख हसन युसेफ याचा मुलगा मसाब युसेफ याचे बुरखाफाड करणारे विधान !
हमास समाजात इतरांचे सहअस्तित्व आणि तडजोड स्वीकारण्याच्या भूमिकेत नाही. हमास चढाई आणि कब्जा करण्याच्या मानसिकतेत आहे. इस्रायल नष्ट करणे, हे काही हमासचे अंतिम उद्दिष्ट नाही. हमासचे उद्दिष्ट ‘खलिफाचे इस्लामिक राज्य जगभरात स्थापन करणे’, हे आहे. ‘हमासचा खरा चेहरा आपण पाहू शकत नाही. धर्मासाठी निरपराध्यांचे रक्त न सांडता आपण इस्लामी राज्य निर्माण करू शकणार नाही’, असे ‘हमास’ने मशिदींमधून आम्हाला (मसाब युसेफ याच्यासह अनेकांना) शिकवले आहे. वयाच्या पाचव्या वर्षीपासून ही शिकवण दिली जाते. हे सर्व सहन करणे माझ्यासाठी पुष्कळ कठीण होते. हमासला पॅलेस्टिनींच्या आयुष्याची चिंता नाही. त्यांना इस्रायली आणि अमेरिकन नागरिक यांच्याही आयुष्याची चिंता नाही. एवढेच नाही, तर त्यांना स्वतःच्या आयुष्याचीही चिंता नाही. त्यांना तत्त्वज्ञानासाठी मरणे, हे एका पूजेप्रमाणे आहे.
– मसाब युसेफ (साभार : ‘सी.एन्.एन्.’ वृत्तवाहिनी)
‘हमास’चे खरे स्वरूप उघड करणारा मसाब युसेफ !
३३ वर्षीय युसेफने वर्ष १९९७ मध्ये हमासशी संबंध तोडले आणि इस्रायलमधील अंतर्गत गुप्तचर यंत्रणा ‘सेवा शिन बेट’साठी काम करण्यास प्रारंभ केला. इस्रायलवरील डझनभर आतंकवादी आक्रमणे हाणून पाडण्यास आणि त्याच्या पूर्वीच्या चळवळीतील अनेक सदस्यांना अटक करण्यास त्याने साहाय्य केल्यानंतर १० वर्षांनी युसेफ अमेरिकेला रवाना झाला. तिथे त्याने राजाश्रय मागितला आणि नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
‘इस्लाम हा शांतीचा धर्म नाही. हा युद्धाचा धर्म आहे. मी माझ्या पूर्वीच्या धर्माचे खरे स्वरूप उघड करणार आहे’, असे मसाब सांगतो. ‘सन ऑफ हमास’ हे त्याचे आत्मचरित्र २५ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्याच्या वैयक्तिक संकेतस्थळावर अरबी भाषेत ते विनामूल्य उपलब्ध आहे.