आतंकवाद्यांनी आई-वडिलांना ठार मारून त्यांच्या बाळाला पाळण्यातून उचलून नेले !
|
(बिस्मिल्लाह म्हणजे अल्लाच्या नावाने)
तेल अविव (इस्रायल) : इस्रायलच्या सैन्याने हमासच्या आतंकवाद्यांनी लहान मुलांना दिलेल्या क्रूर वागणुकीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी हमासने एका इस्रायली बाळाला पाळण्यातून उचलून नेल्याचेही दाखवले आहे. तसेच त्याच्या आई-वडिलांना ठार केल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. लहान मुलांना ‘बिस्मिल्लाह’ म्हणायला लावल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या वेळी हमासच्या आतंकवाद्यांच्या हातात ‘एके ४७ असॉल्ट रायफल’ असल्याचे दिसत आहे.
You can see their injuries,
hear their cries
and feel them trembling from fear as these children are held hostage in their own homes by Hamas terrorists and their parents lie there dead in the next room.These are the terrorists that we are going to defeat. pic.twitter.com/myDsGnOzT1
— Israel Defense Forces (@IDF) October 14, 2023
इस्रायल डिफेंस फोर्स’ने पुढे म्हटले आहे, ‘‘या व्हिडिओमध्ये मुले घायाळ झाल्याचे, तसेच रडत असल्याचे दिसत आहे. आम्ही हमासच्या आतंकवाद्यांना पराभूत करूनच शांत होऊ !’’
दुसरीकडे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले की, मी इस्लामिक स्टेटविषयी पुष्कळ काही जाणतो. हमासने जे केले आहे, ते इस्लामिक स्टेटच्या कृत्यांपेक्षाही वाईट आहे.