हमाससमर्थक काँग्रेसवर कठोर कारवाई व्हायला हवी !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मिर्जापूर (उत्तरप्रदेश) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे उत्तरप्रदेशच्या मिर्जापूर येथे आले असता त्यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरून  काँग्रेसवर टीका केली. येथील प्रसारमाध्यमांशी बोलतांना सरमा म्हणाले की, जे लोक हमासच्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढत आहेत, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी. त्यांच्यासमवेत कठोरपणे वागायला हवे. काँग्रेसवाल्यांनी हमासच्या आतंकवादी आक्रमणांचा निषेध करायला हवा होता. तसेच पॅलेस्टाईनच्या विरोधात बोलायला हवे होते; पण पाकिस्तानप्रमाणेच ते पॅलेस्टाईनच्या बाजूनेच बोलले. हे काही प्रमाणात हमासला पाठिंबा दर्शवते.

 (सौजन्य : NDTV India)

सरमा पुढे म्हणाले की, इस्रायलवर हमासने केलेल्या आक्रमणानंतर काँग्रेसने पॅलेस्टाईनच्या आतंकवादी संघटनेच्या समर्थनार्थ ज्या प्रकारे ठराव संमत केला, ते चुकीचे होते. हमासने १ सहस्र ३०० हून अधिक निष्पाप इस्रायली नागरिकांची हत्या केली. याआधीही काँग्रेसने पॅलेस्टाईनला अनेकदा पाठिंबा दर्शवला आहे. (भारतातील धर्मांध मुसलमानांचे हमास आणि पॅलेस्टाईन यांच्यावर प्रेम असल्यानेच काँग्रेसला, ‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’, हा तिचा जन्मसिद्ध अधिकार असल्यानुसारच वागावे लागते. ‘यात काँग्रेसचे खरेतर काहीच चुकलेले नाही’, असे म्हणण्याची आता वेळ आली आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आसाम राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने संबंधित काँग्रेसींवर कठोर कारवाई करणे सहज शक्य आहे. तसेच ‘जिहादला वारंवार पाठिंबा देणार्‍या काँग्रेस पक्षावर बंदीच का लादू नये ?’, असे कुणी विचारल्यास चूक ते काय ?