सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था यवतमाळ येथे पत्रकार परिषद !

डावीकडून प्रफुल्ल टोंगे, श्री. चेतन राजहंस आणि श्री. श्रीकांत पिसोळकर

यवतमाळ, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या मनात धार्मिक समुहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर ‘सनातन धर्मरक्षण’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसमवेत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी संबोधित केले.