गोव्यासह इतर राज्यांत १३५ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणण्याचा डाव फसला !
अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (‘एन्.सी.बी.’ने)सापळा रचून अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या !
पणजी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) : मुंबई येथील अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एन्.सी.बी.ने) गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांतील विविध भागांमध्ये धाड टाकत अमली पदार्थांची तस्करी करणार्यांवर कारवाई केली. १ मासाहून (महिन्याहून) अधिक काळ चाललेल्या या कारवाईत एकूण अंदाजे १३५ कोटी रुपये किमतीचे २०६ किलो कोकेन आणि ‘अल्प्राझोलम’ हे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. या कारवाईत ३ विदेशी नागरिकांसह एकूण ९ अमली पदार्थ तस्करांना कह्यात घेण्यात आले आहे. हे अमली पदार्थ मुंबईमार्गे गोव्यासह बेंगळुरू, देहली आणि भाग्यनगर येथे पाठवले जाणार होते.
गोव्यात पर्यटक हंगामाला प्रारंभ झाला आहे. या हंगामात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाचे अधीक्षक बोसुएट सिल्वा यांच्या मते ‘एन्.सी.बी.’सह गोवा पोलिसांनाही या तस्कारीविषयी माहिती होती आणि याविषयी गोवा पोलीसही सतर्क होते.
(सौजन्य : OHeraldo Goa)
संपादकीय भूमिकाअमली पदार्थ तस्करी हा राष्ट्रविरोधी गुन्हा ठरवून त्याप्रमाणे त्यातील दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे; कारण शत्रूराष्ट्र पाकिस्तान आणि चीन हे अमली पदार्थांद्वारे देशाची युवा पिढी नष्ट करण्याचे षड्यंत्र रचत आहेत ! |