वीजचोरी करणार्या ८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंद !
ठाणे – डोंबिवलीजवळील खोणी गावात वीजचोरी पडताळणीसाठी गेलेल्या महावितरणच्या विशेष पथकावर ग्रामस्थांनी आक्रमण केले होते. त्यात कर्मचार्यांसह पोलीसही गंभीररित्या घायाळ झाले. महावितरणने ‘ग्रामस्थांनी ७७ सहस्र युनिट्सची वीजचोरी केली असून महावितरणची २० लाख ८० सहस्र रुपयांची हानी केली आहे’, असा अहवाल सिद्ध केला. या प्रकरणी ८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.