टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवणार्या धर्मांधास जमावाचा चोप : धर्मांधावर गुन्हा नोंद आणि अटक !
कोल्हापूर – कसबा बावडा येथे टिपू सुलतानचा ‘स्टेटस’ (‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा लिखाण) ठेवणारा धर्मांध अमन मेहबुब कोरबु (वय २१ वर्षे) याला जमावाने जाब विचारत चोप दिला. (सहस्रो हिंदूंचे धर्मांतर करणारा, त्यांच्या सामूहिक हत्या करणारा, हिंदु महिलांवर बलात्कार करणार्या आणि मंदिरांचा विध्वंस करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतान अनेक धर्मांधांच्या मनात घर करून बसलेला आहे. तो पुसून टाकण्यासाठी परत असे कुणी करणार नाही, अशी कठोर पावले आता सरकाने उचलावीत ! – संपादक) हिंदुत्वनिष्ठ तरुणांनी अमनवर तात्काळ कारवाई होण्यासाठी काही काळ रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी अमनला कह्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आणि त्याला अटक केली. अमनच्या घरावर दगडफेक झाल्याने त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी २९५ (अ) आणि ५०५ (२) अन्वये रात्री १ वाजता गुन्हा नोंद केला आहे. अमन याने ‘आँखो मे है डरकी ताकद, शेर का जबडा फाडा है, मेरा टिपू मेरे मशहुर है’, असे लिखाण असलेली ध्वनीचित्रफिती स्टेटसला लावली होती, असे नोंद केलेल्या गुन्ह्यात नमूद केले आहे. यापूर्वीही कोल्हापूर शहरात जूनमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवल्याने हिंदूंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटून उद्रेक झाला होता. यानंतरही काही धर्मांध तरुणांकडून असे प्रकार घडत असल्याचे लक्षात येत आहे. (काही मासांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात असा प्रकार झालेला असतांना पुन:पुन्हा असे प्रकारे होणे हा हिंदूंना डिवचण्याचा आणि आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार नव्हे का ? यातून त्यांचे हिंदूंविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात नाही ना ? याची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे ! – संपादक)