पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची येथून ८ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
पुणे – बनावट कागदपत्रे सिद्ध करून येथे रहाणारी ३ बांगलादेशी अल्पवयीन मुले आणि ३ महिला यांसह ८ जणांना हडपसर पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हे सर्व उरुळी देवाची (ता. हवेली) येथे रहात होते. त्यांच्याकडे बनावट कागदपत्रांद्वारे सिद्ध केलेले आधारकार्ड, पॅन कार्ड (आयकर विभागाने दिलेले ओळखपत्र), निवडणूक ओळखपत्र आढळले. त्यांच्याकडे भारतामध्ये रहाण्याचा अधिकृत परवाना सापडला नाही. निजाम राठी, बाबू राठी, कमरोल राठी, सागर राठी, नजमा राठी, मरियम राठी, आलम राठी, शाहिनूर राठी अशी नावे आहेत. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. (कठोर शिक्षेअभावीच घुसखोर भारतात येण्याचे धाडस करत आहेत, हे संतापजनक आहे. स्थानिक धर्मांधांच्या साहाय्याविना बांगलादेशी मुसलमान देशात स्थायिक होणे अशक्य आहे. त्यादृष्टीनेही त्यांचे अन्वेषण होणे आवश्यक आहे ! – संपादक)