कुमारिका पूजनाचा पूजक आणि कुमारिका यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘नवरात्रात ९ दिवस प्रत्येक दिवशी एक किंवा पहिल्या दिवशी एक, दुसर्या दिवशी दोन, नवव्या दिवशी नऊ अशा चढत्या पद्धतीने कुमारीकांना भोजन घालावे, असे विधान आहे. ही कुमारीका २ वर्षांपासून १० वर्षांपर्यंतची बोलावतात. देवीपूजन झाल्यावर कुमारीकेची पूजा करतात. प्रथम कुमारीकेचे पाय धुतात, तिला सुशोभित चौरंगावर बसवतात, गंध, पुष्प, परकर-चोळी देतात आणि तिच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. तिला पंचामृत आणि मिष्टान्न समर्पित करतात. मग तिला नमस्कार करतात.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ती’)
१५.१०.२०१८ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात कुमारिका-पूजन करण्यात आले. ‘कुमारिका पूजनाचा पूजक आणि कुमारिका यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाच्या साहाय्याने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत कुमारिका पूजनापूर्वी आणि पूजनानंतर पूजक आणि कुमारिका यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
२ अ १. कुमारिका पूजनानंतर पूजकातील नकारात्मक ऊर्जेवर झालेला परिणाम
२ अ १ अ. कुमारिका पूजनानंतर पूजकातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा न्यून होणे : पूजकामध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ १.५४ मीटर होती. पूजनानंतर पूजकातील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ०.१४ मीटर घट होऊन ती १.४० मीटर झाली.
२ अ १ आ. कुमारिका पूजनानंतर पूजकातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे : पूजकामध्ये आरंभी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. तेव्हा पूजकाच्या संदर्भात ‘यू.ए. स्कॅनर’च्या भुजांनी ८० अंशाचा कोन केला. (‘यू.ए. स्कॅनर’च्या भुजांनी १८० अंशाचा केला, तरच प्रभावळ मोजता येते.) पूजनानंतर पूजकातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झाली. तेव्हा पूजकाच्या संदर्भात ‘यू.ए. स्कॅनर’च्या भुजांनी ० अंशाचा कोन केला.
२ अ २. कुमारिकेमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.
२ आ १. पूजकामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ २. कुमारिका पूजनानंतर कुमारिकेच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ हाेणे : कुमारिकेमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ २.४६ मीटर होती. कुमारिका पूजनानंतर तिच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ०.७० मीटर वाढ होऊन ती ३.१६ मीटर झाली.
२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.
२ इ १. कुमारिका पूजनानंतर पूजक आणि कुमारिका यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे
या सूत्रांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३’मध्ये दिले आहे.
३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. कुमारिका पूजन करण्यामागील शास्त्र आणि महत्त्व : ‘कुमारिका ही अप्रकट शक्तीतत्त्वाचे प्रतीक असल्याने तिच्या पूजनाने तिच्यातील शक्तीतत्त्व जागृत होऊन तिच्याकडे ब्रह्मांडातील तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होण्यास साहाय्य होते. त्यानंतर तिच्या माध्यमातून हे तत्त्व सहजपणे वायूमंडलात प्रक्षेपित झाल्याने प्रत्यक्ष चेतनाजन्य माध्यमातून शक्तीतत्त्वात्मक लहरींचा लाभ मिळण्यास साहाय्य होते. ९ दिवस कार्यरत असलेल्या देवीतत्त्वाच्या लहरींच्या स्वतःच्या देहातील संवर्धनासाठी कुमारिकेची भक्तीभावाने पूजा करून तिला संतुष्ट केले जाते. कुमारिकेमध्ये संस्कारांच्या प्रकटीकरणाचे प्रमाणही अल्प असल्याने तिच्यातून देवीतत्त्वाचा अधिकाधिक सगुण लाभ मिळवणे शक्य होते; म्हणून नवरात्रीत केल्या जाणार्या कुमारिका पूजनाला महत्त्व आहे.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’)
कुमारिका पूजनामुळे कुमारिकेतील शक्तीतत्त्व जागृत होऊन तिच्याकडे ब्रह्मांडातील तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होऊन त्या वातावरणात प्रक्षेपित होऊ लागल्या. त्यामुळे पूजक आणि कुमारिका यांना पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.
१. पूजक : पूजकातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा न्यून झाली आणि त्याच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. त्याच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली.
२. कुमारिका : कुमारिकेच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली. तिच्या एकूण प्रभावळीतही वाढ झाली.
‘हिंदु धर्मात नवरात्रीत सांगितलेल्या कुमारिका पूजनामुळे पूजक आणि कुमारिका यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.३.२०१९)
इ-मेल : mav.research2014@gmail.com
|