मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्या हिंदु युवकाचे तरुणीच्या कुटुंबियांकडून बळजोरीने धर्मांतर !
|
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुणीशी प्रेमसंबंध ठेवणार्या धर्मसिंह नावाच्या हिंदु तरुणाचे तरुणीच्या कुटुंबियांनी धर्मांतर करून त्याचे महंमद रहमान असे नामकरण केले. पीडित हिंदु तरुणाने, ‘मला गुंगीचे औषध पाजून माझी सुंता करण्यात आली आणि नंतर धर्मांतर करण्यात आले’, असा आरोप केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस उपअधीक्षकांनी अन्वेषणाचे आदेश दिले आहेत.
१. पीडित तरुण धर्मसिंह याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘माझे गावातील एका मुसलमान तरुणीशी प्रेमसंबंध होते. लग्नाच्या बहाण्याने मला तरुणीच्या घरी बोलावण्यात आले. तेथे तरुणीच्या वहिनीने मला लाडू खायला दिला. लाडूमधून गुुंगीचे औषध दिल्याने मी बेशुद्ध पडलो. गुंगीचे औषध देऊन बलपूर्वक माझी सुंता केली गेली. सुंता झाल्यानंतर धमकावून माझे धर्मांतर करण्यात आले. मी याला विरोध केला असता तरुणीच्या कुटुंबियांनी माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली.
२. या प्रकरणी भाजपच्या माजी महापौर शंकुतला भारती यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे.
संपादकीय भूमिका
|