‘मेक माय ट्रिप’ आस्थापनाच्या पाकसंदर्भातील उपरोधिक विज्ञापनातून अभिनेत्री स्वरा भास्कर यांना पोटशूळ !
आस्थापनावर भारतियांना लाजणारी कृती केल्याची टीका !
कणार्वती (गुजरात) – ‘मेक माय ट्रिप’ या भारतीय आस्थापनाचे विज्ञापन येथील ‘अहमदाबाद टाइम्स’च्या १४ ऑक्टोबरच्या पृष्ठ १ वर प्रसारित झाले असून यातून पाकिस्तानवर उपरोधिक टीका करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर या दिवशी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हे विज्ञापन होते. बहुतांश भारतियांनी या विज्ञापनाचे स्वागत केले असले, तरी अभिनेत्री स्वरा भास्कर आणि त्यांच्यासारख्या अन्य हिंदुद्वेषी कलाकारांना मात्र यावरून पोटशूळ उठला आहे. स्वरा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘‘हे अत्यंत अश्लाघ्य विज्ञापन असून यातून खेळाडू वृत्ती दिसत नाही. ‘मेक माय ट्रिप’ने असे करायला नको होते. शेजारी देशासाठी ‘दयाळू’ आणि ‘सभ्य यजमान’ अशी भूमिका खर्या अर्थाने निभावणार्या भारतियांना लाजवेल अशी कृती आहे. असे करू नका !’’
‘द वायर’ या हिंदुद्वेषी वृत्तसंकेतस्थळाच्या पत्रकार रोहिणी सिंह यांनीही या विज्ञापनाला विरोध दर्शवला आहे.
काय आहे या विज्ञापनात ?
‘पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना खुले निमंत्रण !’, असे शीर्षक असलेल्या ‘मेक माय ट्रिप’च्या या विज्ञापनात जर भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाकचा पराभव झाला, तर ‘पाक किती अंतराने हरतो ?’, त्यानुसार पाकच्या क्रिकेटप्रेमींना अत्यंत सवलतीच्या दरात भारतयात्रा करायला मिळेल, अशा प्रकारे तीन योजना देण्यात आल्या आहेत. यासह पाकिस्तान्यांचे हसे होईल, अशा प्रकारे त्यांच्यावर उपरोधिक टीका करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|