आनंद (गुजरात) मंदिरावर दगडफेक : शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड
आनंद (गुजरात) – येथील उमरेठस्थित श्री सिद्धनाथ महादेव मंदिरावर दगडफेक झाली. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला, तसेच मंदिरातील शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड करण्यात आली. दुसर्या दिवशी सकाळी पुजारी आणि भाविक मंदिरात गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी गुजरात पोलीस अन्वेषण करत आहेत.
स्थानिक हिंदूंनी तेथील मुसलमान तरुणांवर ठपका ठेवला असून यामध्ये ४ तरुणांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. मंदिराच्या पुजार्यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी मंदिरावर दगडफेक करण्यात आली. मंदिरापासून २०० मीटर अंतरावर जोरावर बाबांचा दर्गा आहे. ३-४ दिवसांपूर्वी मंदिरावर नवीन भगवा ध्वज लावण्यात आला होता, तो फाडून नाल्यात फेकण्यात आला. मंदिराच्या शिखरावरही दगड आणि विटा फेकण्यात आल्या. (हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी हिंदूसंघटन हाच एकमेव उपाय आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकागुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |