सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या १४, तर रस्‍ते विकास महामंडळाच्‍या १५ टोलनाक्‍यांवर हलक्‍या वाहनांना टोल माफ !

महाराष्‍ट्रातील कोणत्‍या मार्गावर टोल माफ आहे ? हे समजून घ्‍या !

मुंबई, १३ ऑक्‍टोबर (वार्ता.) – महाराष्‍ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या सर्वच्‍या सर्व म्‍हणजे १४ टोलनाके, तर महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाच्‍या एकूण ५० पैकी १५ टोलनाके यांवर जीप, कार यांसारख्‍या खासगी गाड्या, तसेच एस्.टी.च्‍या गाड्या आणि शाळेच्‍या गाड्या यांना टोल माफ आहे. महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाच्‍या अन्‍य ३५ टोलनाक्‍यांवर मात्र टोल आकारला जात आहे. या टोलनाक्‍यांची सूची दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करत आहोत. ज्‍या टोलनाक्‍यांवर वरील वाहनांसाठी टोल माफ असूनही टोल आकारला जात असेल, तर नागरिकांना सरकारच्‍या ‘आपले सरकार’ या तक्रार निवारण प्रणालीवर (लिंक –  https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) ऑनलाईन तक्रार प्रविष्‍ट करता येईल.