‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या ईश्‍वरस्‍वरूप आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे परमेश्‍वरस्‍वरूप आहेत’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘एकदा मी एका सूत्राच्‍या संदर्भात बोलण्‍यासाठी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याकडे गेले होते. आमचे बोलणे संपल्‍यावर त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘काळजी करू नकोस. आता छान सेवा कर. परमेश्‍वराची आरती !’’ तेव्‍हा मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले आणि आनंद झाला. मला नेहमी स्‍वतःचे नाव ‘परमेश्‍वराची आरती’, असे लिहिण्‍याची सवय आहे. मला मनातूनही ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे परमेश्‍वर आहेत आणि मी त्‍या परमेश्‍वराची आहे’, असेच वाटत असते; परंतु हे मी कधी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले नव्‍हते, तरी त्‍यांनी पुष्‍कळ प्रेमाने तसे म्‍हटल्‍यामुळे ‘माझ्‍या अंतर्मनातील भाव त्‍यांच्‍या चरणी पोेचला’, असे जाणवले आणि मन कृतज्ञतेने भरून आले.

होमिओपॅथी डॉ. (सुश्री (कु.)) आरती तिवारी

नंतरही माझ्‍याकडून त्‍यांच्‍या आवाजातील ‘परमेश्‍वराची आरती’, या शब्‍दांचे आलंबन होऊन माझे मन रोमांचित झाले. ‘आपले संत ईश्‍वरस्‍वरूप आहेत आणि या सर्वांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉक्‍टर हे परमेश्‍वरस्‍वरूप आहेत’, असे मला वाटते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या मुखातून ‘परमेश्‍वराची आरती’, हे शब्‍द ऐकले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ ईश्‍वरस्‍वरूप आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर परमेश्‍वरस्‍वरूप असल्‍याची मला पुन्‍हा एकदा प्रचीती आली. ‘हे गुरुराया, ‘परमेश्‍वराची आरती’, हे केवळ शब्‍द नसून तुम्‍ही त्‍या शब्‍दांना सगुणात साकारले आणि मला ही अनुभूती दिली’, याबद्दल मी तुमच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– होमिओपॅथी डॉ. (सुश्री (कु.)) आरती तिवारी, फोंडा, गोवा. (२०.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक