साधिकेला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये श्री शांतादुर्गादेवीचे रूप जाणवणे
१. आरती करत असतांना श्री शांतादुर्गादेवीच्या मुखाच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा चेहरा दिसणे
‘आमच्या घरी देवघरात कुलदेवता, दत्तगुरु, ग्रामदेवता श्री शांतादुर्गादेवी आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची चित्रे आहेत. ९.९.२०२१ या दिवशी हरितालिका होती. त्या दिवशी आरती करतांना मला श्री शांतादुर्गादेवीच्या चेहर्याच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चेहरा दिसला. मला वाटले, ‘माझी भावजागृती झाल्यामुळे तसे वाटत असेल’; म्हणून मी काही वेळाने पुन्हा जाऊन पाहिल्यावर मला आधीप्रमाणेच श्री शांतादुर्गादेवीच्या चेहर्याच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा चेहरा दिसला.
२. महर्षींच्या आज्ञेने १२.९.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महाविष्णुयाग झाला. यज्ञस्थळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उपस्थित होत्या. तेव्हा मला त्यांचा चेहरा आमच्या देवघरातील श्री शांतादुर्गादेवीच्या चेहर्यासारखा दिसला.
३. प्रतिदिन पूजा करतांना मला श्री शांतादुर्गादेवीच्या चेहर्याच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा चेहरा दिसतो.
४. मला वाटते, ‘आम्ही सनातनचे साधक किती भाग्यवान आहोत ! श्री शांतादुर्गादेवी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात आश्रमात येऊन आम्हाला मार्गदर्शन करते.’
– आधुनिक वैद्या रूपाली भाटकार, फोंडा, गोवा. (२२.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |