ललित पाटील तुमच्या कह्यात असतांना तुम्हाला नीट सांभाळता आले नाही !
|
पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटनेला १० दिवसांचा अवधी झाला असून पुणे पोलिसांनी आरोपी ललित पाटील याचे भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तरप्रदेश येथून कह्यात घेतले. दोघा आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात उपस्थित केले असता पोलिसांनी ‘त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी’ अशी मागणी न्यायालयाकडे केली. ‘ललित पाटील तुमच्या कह्यात असतांना त्याला नीट सांभाळता आले नाही. आता भूषण आणि अभिषेक यांकडे काय अन्वेषण करणार ?’, असे खडे बोल पुणे पोलिसांना न्यायाधिशांनी सुनावले. न्यायाधिशांनी दोन्ही आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.