हादग्यासारख्या परंपरा जतन करणे अत्यावश्यक ! – सौ. संगीता खोत, माजी महापौर
मिरज – हस्त नक्षत्राचा प्रारंभ होतो, त्या दिवसापासून हादग्याचा प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी हत्तीचे चित्र भिंतीवर लावून त्याला हादग्याच्या फुलांची माळ आणि १६ प्रकारच्या फळांची माळ घालण्यात येते. पदार्थांची खिरापत महिलांनी आणून पदार्थ ओळखण्याचा कार्यक्रम होतो आणि खिरापत वाटली जाते. हिंदु धर्मातील अशा परंपरा लोप पावत आहेत. नवीन पिढीला संस्कृतीची माहिती होण्यासाठी या परंपरा जतन करणे अत्यावश्यक आहे. हस्त नक्षत्राचा पाऊस पडण्यासाठी आपण ईश्वराला प्रार्थना करूया, असे आवाहन सांगलीच्या माजी महापौर सौ. संगीता खोत यांनी केले. भाजप मिरज शहर ‘ओबीसी शाखे’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी सुमनताई खाडे, सुनंदा खोत, शमा जाधव, विद्या गोसावी, साधना देसाई यांसह पुष्कळ महिला उपस्थित होत्या.